रमजान ईद माहिती मराठी – Ramzan Eid Information in Marathi
मुसलमान धर्मीयांची कालगणना चांद्रमानानुसार असते. त्यातला रमजानचा महिना हा मुसलमान लोकांसाठी उपवासाचा असतो.
प्रेषित महंमदांचे कुराण लिखाणाचे काम या दिवशी पूर्ण झाले असे मानले जाते. या महिन्यात शुक्ल प्रतिपदेच्या चंद्र दर्शनाने रोजे सुरू होतात आणि शव्वाल या दहाव्या महिन्यातील चंद्रदर्शनाने संपतात.
चंद्रदर्शन झाले की त्याच्या दुसर्या दिवशी ईद-उल्-फित्र किंवा रमजान ईद साजरी करतात. ‘फित्र’ या शब्दातून दानाची कल्पना सूचित होते. रमजान ईदच्या दिवशी धान्य, वस्त्र इत्यादींचे दान दिले जाते.
अपंग, लहान मुले, बाळंतीण स्त्रिया यांनी रोजे केले नाही तरी चालते. महिन्यातला २७ वा दिवस महत्त्वाचा मानतात. इतर दिवशी जमले नाही तरी या दिवशी लोक उपवास करतात.
सूर्योदयापूर्वी एका तासापासून ते सूर्यास्तापर्यंत ‘रोजा’ म्हणजे अन्न-पाण्याशिवाय कडकडीत उपवास करायचा असतो. या महिन्यात कोणत्याही तर्हेची करमणूक टाळायची असते व प्रार्थनेत वेळ घालवायचा असतो.
रोजांसंबंधी पैगंबरांनी असे म्हटले आहे की, ‘रोजे ठेवणार्यांनी असत्याचा त्याग केला नसेल तर त्याने खाणे-पिणे सोडले असले तरी परमेश्वराच्या दृष्टीने त्याला कवडीचीही किंमत नाही.’
सर्व मुसलमान चांगले कपडे करून एका ठिकाणी जमतात. या ठिकाणाला ‘ईदगाह’ म्हणतात. तेथे सर्वजण नमाज पढतात. मग प्रार्थना चालवणारा इमाम त्यांना अल्लाचे माहात्म्य सांगतो. त्याला खुतबा म्हणतात. नंतर लोक एकमेकांना आलिंगन देऊन ‘ईद मुबारक’ म्हणतात.
या दिवशी लोक परस्परांना भेटायला जातात. दूध व सुका मेवा यांपासून शीरखुर्मा नावाचा गोड पदार्थ बनवतात. लहान मुलांना ‘ईदी’ म्हणजे खाऊला पैसे देतात.
ईद-उल्-फित्र हा मुसलमानांचा फार मोठा व आनंदाचा सण आहे.
पुढे वाचा:
- बकरी ईद माहिती मराठी
- मोहरमची संपूर्ण माहिती
- पतेती सण माहिती मराठी
- गुरू नानक जयंती विषयी माहिती
- बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी
- भगवान महावीर जयंती माहिती
- दत्तजयंती माहिती मराठी
- धनत्रयोदशी माहिती मराठी
- नवरात्र – दसरा माहिती मराठी
- गणेश चतुर्थी माहिती मराठी
- बैल पोळा सणाची माहिती
- नारळी पौर्णिमा माहिती मराठी
- नागपंचमी माहिती मराठी
- गुरुपौर्णिमा विषयी माहिती मराठी
- आषाढी एकादशी माहिती
- वटपौर्णिमा संपूर्ण माहिती
- हनुमान जयंती माहिती
- गुढीपाडवा माहिती
- होळी सणाची माहिती
- दिवाळी सणाची माहिती
- रामनवमी माहिती मराठी