गाढव मराठी निबंध – Donkey Essay in Marathi
गाढवाला मूर्ख असा प्राणि समजण्यात आले आहे. गाढवाला मूर्ख म्हणणे म्हणजे मूर्खापणाच आहे. एखाद्याला ज्यावेळी गाढव असे म्हणतो ते मूर्ख अशा अर्थानेच असते. घोडा आणि गाढव यांची नेहमी तुलना करण्यात येते. गाढव हा घोड्यापेक्षा कमी शक्तीचा, कमी उपयोगाचा आणि हळूहळू चालणारा प्राणि आहे. त्याची बुद्धीपण मंद असते. परंतु गाढवाचा उपयोग जगजाहीर आहे.
गरीब शेतकरी, कामगार, कुंभार आणि धोबी यांच्यासाठी गाढव तर वरदानच ठरते. गाढव एक स्वस्तं परंतु अंत्यत उपयोगी प्राणि आहे. त्याला पाळण्यासाठी त्याला खाऊ-पिऊ घालण्यासाठी जास्त वेळ आणि खर्च होत नाही. गाढव इकडे-तिकडे काहीतरी खाऊन आपवलं पोट भरवतं. झेब्रा देखील गाढवाचीच एक प्रजाती आहे. हा दिसायला थोडा रूबाबदार असतो परंतु त्याला कोणी पाळीव बनवत नाही. पाळीव बनवल्यास झेब्रा तात्काळ मरतो. त्याला प्राणि संग्रहालयात देखील पाहिल्या जावू शकते.
गाढव एक शक्तीशाली प्राणि आहे आणि खूप वजन उचलणारा आहे. त्याच्यावर मीठ, माती, धान्य, खत, इटा, दगडं, लाकूड आदी काहीपण वाहून नेल्या जावू शकते. डोंगराळ आणि अरुंद रस्त्यावरून देखील गाढव किंवा खेचर फारच उपयोगाचा प्राणी ठरतो. खेचर हे गाढव आणि घोड्यापासूनची उत्पत्ती आहे.
गाढवं पाळीव पण असतात आणि मोकाट स्वरूपात देखील आढळतात. गाढवांचा रंग भुरकट किंवा मळकट असा असतो. त्याची उत्पत्ती अफ्रिकेतली असल्याचे समजण्यात येते. या ठिकाणावरूनच तो इतर देशात आणि राज्यात गेला. सुरूवातीला ते एक मोकाट जनावर होतं. नंतर मनुष्याने त्याला आपल्या फायद्यासाठी पाळीव बनवले. गाढवाचे मोठामेठे बाजार भरतात. तिथे त्यांचे प्रदर्शन केले जाते आणि मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्रि होते.
पुढे वाचा:
- चंद्रशेखर व्यंकटरमण मराठी निबंध
- चलचित्रपटांचा प्रभाव मराठी निबंध
- राष्ट्रध्वजाचे मनोगत निबंध
- एका मंदिराचे वर्णन मराठी निबंध
- कर्म हीच पूजा मराठी निबंध
- आमचे बालवीर शिबिर निबंध मराठी
- हॉकी वर मराठी निबंध
- हे विश्वची माझे घर निबंध
- हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी
- हुंडा एक सामाजिक समस्या
- हिरवी संपत्ती मराठी निबंध
- स्वावलंबन मराठी निबंध