जातीयता एक शाप निबंध मराठी
प्राचीन काळापासून मानवाचे विभिन्न वर्गात, गटात, धर्मांत, जातीत विभाजन झाले असून आजही त्यानुसारच तो राहतो. यामुळे लोकांमध्ये आपापसांत प्रेम, सहकार्य, सहिष्णुता, बंधुभाव, त्याग, सुखदुःखात व संकटात कामी येण्याची भावना जागृत झाली. हे समाजात राहणाऱ्या वर्गाचे सुंदर उज्ज्वल स्वरूप आहे. याशिवाय समाजाचे आणखी एक रूप आहे जे अत्यंत घाणेरडे व तिरस्कृत आहे. ते आहे सांप्रदायिकता जातीयतेचे विशाल रूप निर्दोष आहे परंतु त्याचे संकुचित रूप, शापमय आहे. समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गाने आपल्या विचारांच्या निष्ठेसाठी राष्ट्रपती एकनिष्ठ नसणे म्हणजे जातीयता असा जातीयतेचा अर्थ लावता येईल. आपल्या संकुचित विचारधारेचा विकास करण्यासाठी राष्ट्राला गौण समजणे म्हणजे जातीयता होय. विविध जाती, धर्म आणि वर्गांना जोडणारा सेतू जेव्हा स्वत:च्याच परिघात सीमित होतो तेव्हा जातीयता पुढे येते.
भारतात विविध धर्मांचे लोक राहतात. ते आपापसांत भांडतात. जातीमध्ये उपजाती असतात त्या एकमेकीच्या विरोधात असतात. उदा० मुसलमानांमध्ये शिया सुन्नी, ख्रिश्चनांमध्ये कॅथॉलिक, प्रॉटेस्टंट, हिंदूंमध्ये स्पृश्य-अस्पृश्य यांची भांडणे इतिहास प्रसिद्ध आहेत. यातून जातीयतेचे घाणेरडे रूप दिसते. हा जातीयतेचा शाप एखाद्या नर्तकीप्रमाणे नवी-नवी रूपे दाखवितो. १९४७ मध्ये झालेली पाकिस्तानची निर्मिती हा जातीयतेचाच परिणाम आहे. यात लाखो लोक निर्वासित झाले. लाखोंची हत्या झाली. जातीयतेमुळेच काश्मीरमध्ये तणाव, खालिस्तानची मागणी, रामजन्मभूमीचा वाद इ. उत्पन्न झाले. मुस्लिम लीग, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना, स्थापन झाल्या. जातीयता हा असा एक शाप आहे ज्यामुळे धन व प्राणाची हानी होते.
राष्ट्रीय व वैयक्तिक संपत्तीचा विध्वंस, व्यावसायिक प्रतिष्ठांनाची लुटालूट, भीषण नरसंहार होतो. जातीयतेमुळेच मनुष्य मनुष्याच्याच रक्ताला चटावतो. जेव्हा सरकार जातीय दंगली रोखण्यास असमर्थ ठरते तेव्हा शहरात संचारबंदी लागू केली जाते. प्रत्येक जण आपल्याच घरात कैद होतो. हसते खिदळते शहर स्मशानाच्या नीरव शांततेत परिवर्तीत होते. मुले भुकेने रडतात, आजारी माणसे बिना औषधाची मरतात, आवश्यक वस्तूंचा अभाव निर्माण होतो. वस्तूंच्या कीमती आकाशाला भिडतात, रोजी, रोटी रोजगाराचे मार्ग बंद होतात. दंगलीत मेलेल्या लोकांची ओळख न पटल्यामुळे त्यांना बेवारस ठरवून त्यांची अंत्यक्रिया केली जाते.
कोणत्या कारणामुळे जातीयतेच्या आगीचा वणवा पसरत चालला आहे? कोणताही धर्म दुसऱ्या धर्माची घृणा करण्यास प्रवृत्त करीत नाही. इकबालच्या या ओळी प्रसिद्ध आहेत.
मजहब नही सिखाता आपस में बैर करना।
हिंदी है हम वतन है हिंदोस्तां हमारा।।
यावरून हे स्पष्ट होते की एक धर्म दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध नाही.
जातीयतेचे मूळ कारण बाह्य नसून अंतर्गत आहे. आपली संकुचित मानसिकता, दृष्टिकोणच या रोगाचे मूळ आहे. देशाच्या ऐक्याला याचाच सर्वात मोठा धोका आहे. चारित्र्य, आदर्श, निष्ठा, त्याग, सेवेला सांप्रदायिक तत्त्वांमधे कोणतीही किंमत नाही, स्थान नाही. समाज त्यांच्यासाठी मूल्यहीन आहे.
जातीयतेच्या हवनकुंडांच्या आगीत तूप टाकण्याचे काम आपल्या देशातील राजकारणी नेते करतात. निवडणूक काळात जातीच्या आधारे वाटण्या करणे, वेगवेगळ्या धर्मांच्या, लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ करणे, त्यांची मते आपल्याकडे खेचून घेणे ही आपल्या राजकारणाची अभिन्न अंगे बनली आहेत.
मनधरणी करण्याची वृत्ती जातीयतेला आणखी कलुषित करते. प्रत्येक सरकार सत्तेवर येताच आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी भविष्यातील मते बँकेत सुरक्षित ठेवू इच्छिते. यासाठी ते अल्पसंख्याकांना निरनिराळ्या सुविधा प्रदान करतात गुन्हेगारांना निरपराध सिद्ध करते. याच्या आडून जातीयतेचे विष पसरविते. आणि सत्तेवर आपली पकड़ घट्ट करते. ज्याठिकाणी गुन्हेगार देशभक्तीचा मुखवटा धारण करून राजकारणात उतरतात. संसदेत विराजमान होतात अशा देशाचे भविष्य काय सांगावे? देशातील अल्पसंख्य (ख्रिश्चन/मुसलमान) गटांचे लोक आपल्या धर्माप्रति एकनिष्ठ व कट्टर आहेत.
धर्माचा प्रसार-प्रचार करणे, धर्मासाठी बलिदान करण्यात स्वत:चा गौरव समजणे त्यांच्या कट्टरतेचे निदर्शक आहे. ते धर्मासाठी मरू शकतात पण तडजोडीसाठी झुकण्यास तयार नसतात. सत्तेचा मोह हे पण जातीय शापाचे एक मुख्य कारण आहे. ख्रिश्चन व मुसलमान धर्म राजकारणात जगात सर्वोच्च शिखरावर आहेत. ख्रिश्चन प्रगतीच्या शिखरावर विराजमान झालेले आहेत. कोणत्याही राष्ट्राजवळ त्यांच्याशी वैर करण्याची हिंमत नाही. थोड्याशा शक्तीने सगळे जग हलविण्याची त्यांच्यात क्षमता आहे. अरब राष्ट्रांजवळ तेल आहे. तेलाअभावी जग चंगू होईल. म्हणून आपले सरकार ख्रिश्चन आणि मुसलमानांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास घाबरते.
कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कच्छपासून कामरूनपर्यंत पसरलेला आपला हा देश भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथे येण्यासाठी देवता पण तरसतात. अशा देशावर जातीयतेचा विषारी नाग बसला तर याच्या धर्मानिरपेक्षतेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहील. अशा परिस्थितीत आपणास सर्व प्रथम जनतेची मानसिकता बदलावी लागेल. हे कार्य प्राथमिक स्तरापासून सुरू झाले पाहिजे. लहान मुलाच्या कोमल भावनांशी ओळख करून देऊन याची मुळेच कापली तर हा जातीयतेचा वृक्ष फुलणार, फळणार नाही. जातीयता पसरविणारास कठोर शिक्षा दिली जावी. शिक्षा समान असावी. मनधरणी करण्याच्या प्रवृत्तीचा त्याग करून सरकारने उत्सव, सर्वधर्म संमेलनांद्वारे परस्पर सद्भावनेचा प्रचार-प्रसार करावा. रेडियो, दूरदर्शन, मासिके, वृत्तपत्रे या सारख्या प्रसार माध्यमांद्वारे जातीयताविरोधी कार्यक्रम प्रसारित करावे. जातीयतेचा शाप देशाच्या प्रगतीत अडथळा आहे. म्हणून तो समूळ नष्ट केला पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे ती कोणत्याही धर्माचे स्वेच्छेने पालन करू शकते. हे स्वातंत्र्य भारताला महाशक्ती बनवू शकते. परंतु धार्मिक कट्टरपणा राष्ट्राच्या प्रगतीत अडसर बनू शकतो. जातीय संकुचितपणा विकासोन्मुख नसून – हासाकडे नेणारा आहे. ज्यामुळे राष्ट्र व मानवता प्रभावित होते. आपले उद्दिष्ट
“राष्ट्रीयता धर्म हमारा और स्वतंत्रता नारा है। – .
भारत हमको अपने प्राणों से भी ज्यादा प्यारा है।”
पुढे वाचा:
- जीवनात विनोदाचे स्थान निबंध मराठी
- जीवनात कलेचे स्थान निबंध मराठी
- जागतिक खेळांमध्ये भारताचे स्थान निबंध मराठी
- कृष्णा जन्माष्टमी वर मराठी निबंध
- चंद्रशेखर व्यंकटरमण मराठी निबंध
- चलचित्रपटांचा प्रभाव मराठी निबंध
- राष्ट्रध्वजाचे मनोगत निबंध
- एका मंदिराचे वर्णन मराठी निबंध
- कर्म हीच पूजा मराठी निबंध
- आमचे बालवीर शिबिर निबंध मराठी
- हॉकी वर मराठी निबंध